LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Wednesday, September 8, 2021

 

कोव्हीड काळातील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मानसिकता

----------------------------------------------------------------------------------------------------

                मी दत्तात्रय मारुती नाळे ,उपशिक्षक  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , विठ्ठल वाडी तालुका- पाटण ,जिल्हा- सातारा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था  फलटण व जिल्हा परिषद  सातारा  पंचायत समिती पाटण शिक्षण विभाग पाटण  आयोजित शाळा स्वच्छता कृती आराखडा सत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो .

                  या सत्रामध्ये  आपण टाळेबंदीच्या काळात  मुलांच्या मानसिकतेवर  झालेले दुष्परिणाम आणि कोविड-19 बद्दल असलेले समज व गैरसमज  या बद्दल माहिती घेणार आहोत ......साधारणतः गेल्या  दीड वर्षापूर्वी म्हणजेच ३०जानेवारी २०२० रोजी आपल्या देशात  केरळ राज्यामध्ये पहिला कोरोना रुग्ण साप डला .त्यानंतर  ९मार्च २०२० ला महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण पुणे येथे  सापडला .11 मार्च 2020 ला कोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर  करण्यात आले .या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून 11 मार्च पासून  महाराष्ट्रात  बससेवा बंद करण्यात आली .राज्यात महामारी रोग अधिनियम 1897  लागू करण्यात येऊन जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले .23 मार्च ला  जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून राज्यात संचार बंदी  लागू करण्यात  आल्याची घोषणा  मा.मुख्यमंत्र्यानी केली आणि त्यामुळे शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा  निर्णय  घेण्यात आला .शैक्षणिक वर्ष सन २०२१ -२२ पासून शाळा बंद पण शिक्षण सुरु झाले  मग या शाळा बंद पण शिक्षण सुरु  प्रवाहात मुलांना online   offline पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरु झाले .गेली दीड वर्ष आपण याच पद्धतीने मुलांना शिक्षण देत आहोत .शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास अर्थातच शारीरिक ,मानसिक व भावनिक विकास होय .प्रत्यक्ष शाळा सुरु असताना विद्यार्थ्यांचा हा विकास विविध मार्गांनी होत असतो प्रत्यक्ष अध्यापन खेळ शारीरिक कसरत कला कार्यानुभव या सारख्या विविध सहशालेय उपक्रमातून विद्यार्थी सर्वागीण विकास साधत असतो .परंतु या जागतिक महामारीच्या संकटामुळे आपला विद्यार्थी स्वअभिव्यक्ती ,खिलाडूवृत्ती ,संघीक् भावना ,विद्यार्थी –विद्यार्थी  विद्यार्थी –शिक्षक आंतर्क्रिया या सर्व प्रक्रियेपासून दुरावला आहे .व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य विषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत .

                     ग्रीक तत्ववेत्ता थेल्स यांनी म्हटलेल आहे कि A SOUND MIND IN A SOUND BODY.अर्थात  निरोगी शरीरात निरोगी मन वसते .आणि जर आपले शरीर व्याधीग्रस्त झाले तर त्याचा दुष्परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो .या कोरोना काळातील टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात खंड पडून त्याचं चलनवलन बंद होऊन त्यांना घरातच बंदिस्त रहाव लागल्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर खोलवर परिणाम झालेला आहे .आणि यामुळे विविध लक्षणे दिसू लागलेली आहेत .    आपण PPT च्या माध्यमातून ती लक्षणे पाहूयात .... संभ्रम :-कोरोना आजाराविषयी आपला विद्यार्थी आजही संभ्रमात असल्याचे जाणवते .कोरोनाविषयी प्रसारमाध्यमामध्ये  होणार्या चर्चा ,विविध भयावह बातम्या ,VIDEO ,आजूबाजूला कोविड विषयक पुरेशा प्रमाणात जागरूकता नसल्यामुळे पसरल्या जाणार्या अफवा  या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम होऊन विद्यार्थ्याच्या मनामध्ये ...१)हा आजार आहे तरी काय ? २)तो मला तर होणार नाही ना ?हा आजार झाला तर काय होईल ?अश्या प्रकारच्या प्रश्नांचे काहूर मनामध्ये निर्माण होऊन आपला विद्यार्थी संभ्रमावस्थेत गुरफटला आहे .

काळजी - बालरोग तज्ञांच्या मते ,सध्याच्या काळात जी मुल कोरोना व्यतिरिक्त  आजारानी  ग्रस्त  होत आहेत .त्यामागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे कोरोना या आजाराविषयी मुलांच्या मनात असणारी अनावश्यक काळजी आणि या काळजीमुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन शारीरिक स्वास्थ्य बिघडते .

एकाकीपणा - शाळा  बंद असल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थी आंतर्क्रिया विद्यार्थी शिक्षक आंतर्क्रिया या बंद झाल्या .कोरोना काळातील संचार बंदीमुळे विद्यार्थी घरातच अडकून पडल्याने एकटेपणा वाढला .मुलांना बाहेर मोकळेपणाने जाता येत नसल्याने मुक्त आणि स्वछंदी  खेळण बंद होऊन समवयस्क मित्रांसोबतचे खेळाच्या माध्यमातून होणारे विचारांचे आदानप्रदान बंद झाले .मुलांच्या अनुभव विश्वावर मर्यादा आल्या .हसणारे ,बागडणारे ,किलबिल्णारे बालविश्व चार भिंतीत बंदिस्त झाले आणि त्यातून एकाकीपणा वाढला .एकाकीपणा मुले चिडचिडेपणा वाढून मुलामध्ये एक प्रकारची उदासीनता निर्माण झाली.

मोबाईल/टीव्ही व्यसन  - covid-19 च्या काळात शिक्षणाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आपल्याला जाणवू लागले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण या दोन पद्धतीनुसार अभ्यास करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक अनेक डिजिटल साधनांचा वापर करावा लागत आहे. त्यामध्ये मोबाईल ,टॅबलेट, NOTE PAD  ,कॉम्प्युटर ,लॅपटॉप इत्यादी साधनांचा विद्यार्थी वापर करत आहे असं दिसत आहे.  या सर्व साधनांचा वापर करणं  विद्यार्थ्यांना अपरिहार्य असे झाले आहे. त्यामुळे सहाजिकच मुले या ऑनलाईन साधनाकडे ओढली गेलेली आहेत. अनेक समाज माध्यमातून शिक्षण घेण्याच्या पद्धतीविषयी चर्चा होत आहेत. COVID – 19 या काळामध्ये सध्या तरी ऑनलाइन शिक्षण हीच पद्धती वापरावी लागत आहे.ONLINE शिक्षण पद्धतीमध्ये मोबाईलचा वापर अनिवार्य ठरला .शाळा बंद पण शिक्षण सुरु या प्रवासात टीव्ही  वर प्रसारित होणारे वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठीच्या आग्रही भूमिकेने मुलांचा मोबाईल व टीव्ही  पाहण्याचा कालवधी वाढला .त्यात अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल व टीव्ही चा मनोरंजनासाठी देखील नकळतपणे अतिवापर झाल्याने मुलांच्या चेतासंस्थेवर  परिणाम होऊन अस्वस्थता व चीड्चीडेपणा वाढीस लागला .

संभ्रम -  covid-19 बाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था आहे. सध्या हा विद्यार्थी अस्वस्थ आहे. COVID  संदर्भात असणारी भीती त्याच्या मनामध्ये खूप आहे. हा COVID चा आजार मला होईल का  कोहिनूर काय आहे  त्यामुळे काय होईल या बाबींचा जास्त विचार विद्यार्थी करताना दिसत आहेत .त्यामुळे साहजिकच त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे. कोहीर विषयी अनेक मुलं अनावश्यक विचार करताना मानसोपचार तज्ञ ना दिसत आहेत. COVID चा फोबिया त्यांच्या मनामध्ये तयार होत आहे व त्याचे मानसिक आजारात रूपांतर होताना दिसत आहे.

 

आत्मविश्वासाचा अभाव :- online शिक्षणात विद्यर्थ्याच्या कार्यप्रवणतेला मर्यादा पडल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झाला.यासोबतच Learning by doing हि संकल्पना मागे पडून ध्येयहीनता वाढीस लागली .  कोरोनामुळे मागील दीड ते दोन वर्षापासून सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे एक वेगळ्या स्वरूपाच्या समस्या मुलांच्यात जाणवत आहेत. कोरोना काळाच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या मध्ये शाळे संबंधी एक शिस्तबद्ध व काटेकोरपणा असा होता. त्याची दिनचर्या एक शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेली होती. तो शाळेतील सर्व कृती किंवा त्याचे शैक्षणिक काम एका साचेबद्ध पद्धतीने करत होता. कुरणाच्या या महामारी मुळे शाळेत शिस्तबद्ध असलेली दिनचर्या त्याची पूर्णपणे विस्कळीत झालेली आपणास दिसून येते. आणि  शाळेत असणारी दिनचर्या व शिस्तबद्ध पणा हा पूर्ण विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झालेला आहे. माझ्या शिक्षणाचे काय होईल ? अशी एक अनामिक भीती त्याच्या मनामध्ये तयार होऊ लागलेली आहे.

रिकामेपण  -online शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना जास्त काळ कार्यमग्न ठेवण्याच्या उद्धीष्टांवर मर्यादा आल्याने विद्यार्थ्यांना जास्त मोकळा वेळ मिळाला व त्यातून  त्यांचे रिकामेपण वाढले . एकूणच विद्यार्थी हा शालेय वातावरणापासून दूर असल्यामुळे त्याच्या अंगी  शिथिलपणा आलेला आहे.  या शिथिलतेच्या अनेक पालक आज तक्रारी मांडताना दिसत आहेत.

 हा रिकामा आहे.

 हा कोणाचेच ऐकत नाही.

 हा चिडचिडा बनलेला आहे.

 हा उनाड झाला आहे.

 त्याच्या अंगी बिनधास्तपणा आलेला आहे.

 हा चिडचिडा झाला आहे.

 हा खोड्या काढायला  लागलेला आहे.

 घरातील भावंडे ,कुटुंबातील इतर माणसे ,जवळची माणसे व नातेवाईक याबाबत त्याची भावनिकता  बदललेली आहे . तो एकाकीपणात वावरायला लागलेला आहे. तो दूर कुठेतरी एकटा जाऊन बसतोय. त्याच्या मनातील भावना त्याच्या मनाचे विश्व हे तो इतरांशी शेअर करत नाही. तो  इतरांशी व मित्र वर्गाची बोलत नाही. एकूणच त्याच्या अंगी रिकामेपण येऊ पाहत आहे.

 शिक्षणाचा अभाव- सध्यातरी  कोरोना या महामारी मुळे शिक्षणाची पद्धती  बदललेली आहे. त्यामुळे मुलांना ACCEASS  नाही. याची अनेक कारणे आपणास दिसत आहेत. शिक्षणाची बदललेली पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन या स्वरूपात सुरू आहे. सर्वच मुलांना मोबाईल मिळणे शक्य नाही व ते मुलांना घेऊन देणं सर्व स्तरातील पालकांनाही शक्य नाही. एकूणच परिसराचा भौगोलिक विचार करता मोबाईल बाबत नेटवर्क समस्या , रिचार्ज ची समस्या अशा अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे शैक्षणिक डिप्रेशन मुलांमध्ये आढळून येत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर झालेला दिसून येत आहे. या सर्व बाबींमुळे त्याच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव दिसून येत आहे.

आत्मविश्वासाच्या अभावामुळे ही सर्वच मुले गोंधळलेली असतात. माझ्या शिक्षणाचं काय होईल ?  माझी शाळा केव्हा उघडेल ? मला नियमितपणे शाळेत जाता येईल काय ? अशा  अनेक पद्धतीमुळे मुलांची मानसिकता बदललेली आहे जी मुलांच्या मनावर खोल परिणाम  करणारी अशी आहे.

 काही अंशी मुलाकडे इंटरनेटची सोय किंवा उपलब्धता झालेली आहे. शहरी भागांमध्ये इंटरनेटची सोय मुलांच्या कडे उपलब्ध आहे. त्यामानाने ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा कमी प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे तो विद्यार्थी अनेक शैक्षणिक बाबी या डिजिटल माध्यमातून सर्च करताना पहायला मिळत आहे. त्याचबरोबर तो विद्यार्थी अनेक अनावश्यक गोष्टी सुद्धा सर्च करायला लागलेला आहे  ज्या त्याच्या मनावर खोल परिणाम करू शकतात आणि त्याचे परिणाम होऊ शकतात. या स्क्रीनच्या अतिवापराने विद्यार्थ्यांच्या मध्ये अनेक विकार उद्भवला सुरुवात झालेली आहे. ब्रेन च फंक्शन बदललेल आहे. विद्यार्थी कायम ऑनलाइन शिक्षणात गुंतून लागल्यामुळे तो सर्च सारख्या बाबींमध्ये जास्त विचार करू लागले आहे. जास्त वेळ त्याने मोबाईल पाहिल्यामुळे वा डिजिटल  साधन वापरल्यामुळे  विद्यार्थ्यांना डोळ्यांचे अनेक विकार व्हायला सुरुवात झालेली आहे. तास न तास विद्यार्थी त्या मोबाईलच्या स्क्रीन कडे पाहत असल्यामुळे डोळ्यांच्या समस्यांना त्याला सामोरे  जावे लागत आहे. डोळ्यांच्या विकारा बरोबरच कानाचे विकार देखील वाढू लागलेले आहेत. अशा अनेक प्रकारच्या समस्या या विद्यार्थ्याच्या शिक्षणाविषयी जाणवत आहेत. पालकांनाही मुलांमधली  वर्तणूक दोष दिसत आहेत. मुलांच्या मागण्या वाढल्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो चिडलेला दिसतो आणि त्याचेच रूपांतर पुढे मानसिक आजारात होताना दिसत आहे.अश्याप्रकारे  आपला विद्यार्थी टाळेबंदीच्या काळात संभ्रम ,काळजी ,भीती,चीडचीडेपणा ,रिकामेपण ,आत्मविश्वासाचा अभाव ,धेयहीनता या मानसिक लक्षणांनी ग्रस्त झाल्याचे दिसून येते.

 

BLACK BOARD ते SCREEN प्रवास  ;-या जागतिक महामारीच्या  पार्श्वभूमीवर आपल्या  शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होऊन आपल्याला खडू फळा सोडून स्क्रीन जगतामध्ये प्रवेश करावा लागला .तस पाहिलं तर हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता .कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये या प्रवासात अनंत अडचणी असतात .जसे पालकांची गरीब परिस्थिती,NETWORK चा अभाव ,ANDROID मोबाईल वापराबाबतची अनभिज्ञता  अशा  असंख्य अडचणींना सामोरे  जात आपल्याला ज्ञानदानाचे कार्य BLACK BOARD ते  SCREEN या मार्गावर करावे लागते .  एकूणच हा नवीन बदल झालेला आहे शिक्षक म्हणून आपला प्रवास हा एका शाळेपासून म्हणजेच COMFORTABLE ATMOSPHERE  पासून   म्हणजेच ब्लॅक बोर्ड  ते स्क्रीन असा झाला आहे.          

  शिक्षकांचे विद्यार्थ्यासाठी कार्य -

1 ) COVID -19 बाबत  सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे .कोरोनाच्या तिसर्या लाटेचा प्रादुर्भाव आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाढू नये .म्हणून आपण माझे मुल माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत करत असलेल्या विद्यार्थी पालक समुपदेशनात आपल्याला मुलांच्या मनातील भीती दूर करावयाची आहे .SMS  या त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे.

1) Social distancing  .

2)  MASK  .

3)  SANITIZATION

2)मुलांची दिनचर्या काटेकोर करणे- मुलांची दिनचर्या काटेकोर करण्यासाठी मुलांना त्यांच्या वयोगटानुसार कृतीपत्रीकेतील विविध कृती व उपक्रमाच्या माध्यमातून कार्यप्रवण ठेवायचे आहे .

3)स्क्रीन वापरण्याची वेळ मर्यादित ठेवण्याचा उपदेश -  online शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी स्क्रीन addict झाल्याने त्यांच्यामध्ये डोळे व कान यासंबधीच्या समस्या उदभऊ लागल्या आहेत .त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन वापरण्याचा वेळ मर्यादित राहील यासाठी computer,laptop,notepad,mobile,tablet,television यांचा कमीतकमी वापर करावयाला सांगायचं आहे म्हणजेच स्क्रीन वापर कमी होउन.मुलाना  जे mobile चे  /स्क्रीनचे  व्यसन लागले आहे ते कमी होण्यास मदत होईल .दररोज जास्तीतजास्त  ६० मिनिट इतकाच स्क्रीन time राहील एवढी दक्षता घ्यावी लागेल .

4) शिक्षक विद्यार्थी चर्चासत्र  आयोजित केले पाहिजेत .या चर्चासत्रामध्ये  अभ्यासक्रमावर चर्चा झाली पाहिजे .विद्यार्थ्याच्या जिव्हाळ्याच्या  विषयावर चर्चा झाली पाहिजे .कुटुंब.

5)शिक्षक पालक चर्चासत्र  आयोजित केले पाहिजेत मातापालक संघ शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सभेमध्ये पालकांशी चर्चा  होऊन विद्यार्थ्यांचे वर्तन बदल पालकांनी शिक्षकाना सांगून  शिक्षकांनी पालकांना विद्यार्थ्यानामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवण्यासाठी आवश्यक असे निकोप वातावरण कसे घरात निर्माण करावे याविषयी मार्गदर्शन करावे .

6)सकारात्मक मानसिकतेसाठी गट;-विद्यार्थ्यामध्ये असणारे  विविध कलागुण व कौशल्य वाढीस लागावीत म्हणून प्रोत्साहित  करायचे आहे .मिळालेल्या मोकळ्या वेळेत विविध छंद जोपासावेत जसे चित्रकला ,गायन ,वादन, यासाठी  विद्यार्थ्यांना उद्युक्त करावायचे आहे .

7)विद्यार्थ्यासाठी ध्येय ठेवणे ;-विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विविध नवनवीन गोष्टी शिकण्याचे ध्येय त्यांच्यासमोर ठेऊन ती ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रबलन देणे .या सर्व बाबींची गृह्भेटीदार्म्यान विचारपूस करणे आवश्यक आहे .

6) गृहभेटी-दरम्यान विद्यार्थ्यामधील मानसिक भावनिक वर्तणूक  बदल  ओळखणे आणि त्याचे कारण जाणून घेणे .आणि त्याचे कारण जाणून  घेतले पाहिजे .पालकांशी चर्चा करून कारण जाणून घेतल्यावर गरज भासल्यास  मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्यास सुचविणे .

शिक्षकाचे तणाव नियोजन

            सध्या आपण सर्वजण  राज्यशासनाचे विविध उपक्रम  whatsapp स्वाध्याय ,शिकू आनंदे ,गोष्टीचा शनिवार्,read to me app,दैनदिन अभ्यासमाला , टॅग मीटिंग, गृह भेटीदरम्यान अध्ययन-अध्यापनत टीली-मिली  कार्यक्रम , दूरदर्शन व आकाशवाणी वरून प्रसारित होणारी शैक्षणिक कार्यक्रम . अध्ययन अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक प्रकारच्या ऑनलाईन मीटिंग ,  कॉन्फरन्स कॉल अध्यापन ,  शाळा व्यवस्थापन समित्या बैठकांचे नियोजन ,  वाचन चळवळी अंतर्गत अवांतर वाचन  ,   घरोघरी शाळा इत्यादी उपक्रम राबवित आहोत.  या सर्व बाबींच्या बरोबरच COVID संदर्भातील KORONA योद्धा म्हणून अनेक प्रशासकीय कामे , शाळांची प्रशासकीय कामे  व इतर कामे त्याचबरोबर online शिक्षणाचे  नियोजन करून हे सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचवत असताना  वेगवेगळ्या समस्यांना  सामोरे जात असल्यामुळे शिक्षकांचा मानसिक ताण वाढतो.भौगोलिक परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवताना शिक्षकांना असंख्य अडचणी येऊन त्यांच्यात मानसिक तणाव निर्माण होतो . ातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ते बदल स्वीकारून ते बदल अंगीकारणे आवश्यक आहे. laptop,computer,tablet,mobile,tv यासारख्या technical साधनाचा वापर  करण्याचे  तंत्रज्ञान  शिकून त्याचा वापर आपल्या विद्यार्थ्यांच्या online शिक्षणात  प्रभावीपणे करावयाचा आहे .त्यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे .आपण आपल्या कार्यशैलीत बदल करून  आपल्या तणावाचे योग्य व्यवस्थापन करू शकतो.online शिक्षणाच्या माध्यमातील  facebook,twitter,whatsapp इत्यादी साधनाचा वापर  आपल्या शैक्षणिक कार्यप्रणालीमध्ये करण्याचे तंत्र आत्मसात करून घेणे .कार्य्शैलीमध्ये बदल करून आपल्या कामाचे सुयोग्य नियोजन करून शाळास्तरावर कामाची विभागणी करून कामामध्ये समन्वय साधावयाचा आहे ,

नकारात्मक प्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवणे .स्वतःला सतत कार्यमग्न ठेऊन शैक्षणिक काम समरसतेने करणे .वेळोवेळी  भराव्या लागण्यार्या  शैक्षणिक लिंका  प्रशिक्षण या सर्वांकडे शिकण्याची नवी संधी म्हणून पहिले जावे व त्यातून सकारात्मकता  वाढीस लागावी .या सर्व बाबीसोबतच आपण सर्वांनी स्वतःसाठी काही वेळ देऊन  प्रतेकाने किमान एक तरी छंद जोपासला पाहिजे  कारण  छंद जोपासल्यामुळे जीवनाला सार्थकतेची सुंदर किनार लाभते .शारीरिक मानसिक पिडा कमी करण्यासाठी छंद हा  जोपासायचा आहे. यामध्ये गायन असेल वादन खेळ चित्रकला व मुक्त पर्यटन अशा बाबी शिक्षकांनी जर केल्या तर शिक्षकांना ताण-तणावाचे नियोजन करणे सोप होईल.  समाजाच्या गरजा काय ? समाजाला मदत कशी करता येईल. या  महामारीच्या काळात स्वतःची गुणवत्ता वाढवणे नवनवीन कौशल्य विकसित करून घेणे यामुळेमानसिक ताण तणाव कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. आपले मित्र सहकारी यांच्यासोबत सहकार्य वृत्ती जोपासणे यामधून आपण आपल्या ताणतणावाचे नियोजन करू शकतो…..!!   

No comments:

Post a Comment