संधी
..............................................................................
संधीमुळे दोन शब्दांचा एक जोडशब्द तयार होतो.
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोबदल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या एकत्र होण्याला संधी असे म्हणतात.
' संधी म्हणजे ' सांधणे किंवा जोडणे होय.
.......................................................................
संधीचे प्रकार
1 ] स्वर संधी - जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिसळतात तेव्हा त्या संधीला ' स्वर संधी ' असे म्हणतात.
स्वर संधी = स्वर + स्वर
उदा-
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
महिला+ आश्रम |
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
नियम -2 :- ‘ अ ‘ किंवा ‘ आ ‘ च्या पुढे ‘ इ ‘ किंवा ‘ ई ‘ आल्यास दोन्ही ऐवजी ‘ ए ‘ हा येतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | नरेश | नर + ईश | अ + ई = ए |
२ | शुभेच्छा | शुभ +इच्छा | अ +इ = ए |
३ | रमेश | रमा + ईश | आ + ई =ए |
........................................................................
नियम -3 :- ‘ अ ‘ किंवा ‘ आ ‘ च्या पुढे ‘ उ ‘ किंवा ‘ ऊ ‘ आल्यास दोन्ही ऐवजी ‘ओ ‘ हा येतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | चंद्रोदय | चंद्र + उदय | अ + उ = ओ |
२ | धारोष्ण | धारा + उष्ण | आ + उ = ओ |
३ | गांगोर्मी | गंगा + उर्मी | आ + ऊ = ओ |
..........................................................................
नियम -४ :- ‘ अ ‘ किंवा ‘ आ ‘ च्या पुढे ‘ ए ‘ किंवा ‘ ऐ ‘ आल्यास दोन्ही ऐवजी ‘ ऐ ‘ हा येतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | सदैव | सदा + एव | आ + ए = ऐ |
२ | मतैक्य | मत + ऐक्य | अ + ऐ = ऐ |
३ | प्रज्यैक्य | प्रजा + ऐक्य | आ + ऐ = ऐ |
........................................................................
नियम – 5 :- ‘ अ ‘ किंवा ‘ आ ‘ च्या पुढे ‘ ओ ‘ किंवा ‘ औ ‘ आल्यास दोन्ही ऐवजी ‘ औ ‘ हा येतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | जलौघ | जल + ओघ | अ +ओ = औ |
२ | गंघौघ | गंगा + ओघ | आ + ओ =औ |
३ | महौदर्य | महा + औदार्य | आ + औ =औ |
.............................................................................
नियम – 6 :- ‘ अ ‘ किंवा ‘ आ ‘ च्या पुढे ‘ ऋ ‘ आल्यास त्याऐवजी ‘ अर् ‘ हा येतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | देवर्षी | देव + ऋषी | अ + ऋ = अर् |
२ | महर्षी | महा+ ऋषी | आ + ऋ = अर् |
..........................................................................
नियम – 7 :- ‘ इ , उ ऋ या ऱ्हस्व ‘ किंवा दीर्घ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे य् , व् , र् हे येतात आणि त्यांत पुढील स्वर मिसळतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | कित्येक | किती + एक | ई + ए = य् + ए = ऐ |
२ | मन्वंतर | मनु + अंतर | उ + अ = व् + अ = व |
३ | पित्राज्ञा | पितृ + आज्ञा | ऋ + आ = र् +आ = रा |
..........................................................................
नियम – 8 :- ए , ऐ , ओ ,औ यांच्यापुढे स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे अय . आय , आव आव येतात आणि त्यांत पुढील स्वर मिसळतो.
अ न | जोडशब्द | पोटशब्द | एकापुढे एक स्वर घेऊन संधी बनलेला स्वर |
१ | नयन | ने + अन | ए + अ =अय +अ = अय |
२ | नाविक | नौ + इक | औ +इ =आय +इ = आवि |
३ | गायन | गै + अन | ऐ + अ = आय + अ = आय |
No comments:
Post a Comment