माझी आई
------------------
माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. तिने मला माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला पूर्ण आयुष्य कामात येतील. म्हणून मी गर्वाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जितके सांगावे तेवढे कमीच आहे.
आपण आई शिवाय सुखी जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. आईला प्रेम व करुणा चे प्रतीक मानले जाते. एक आई जगभराचे कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते.
आई आपल्या मुलांशी खूप जास्त प्रेम करते. एका वेळेला ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या पोरांना जेवण देणे विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एक शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही मुलांपासून नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या जीवनात आईच्या या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. माझ्या आईचे नाव निलम आहे ती खूपच धार्मिक स्वभावाची स्त्री आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप ज्ञान आहे. ती घरच्या कामात रस घेते.
माझी आई घरातील सर्व सदस्यांची काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते. जर घरात कोणी आजारी पडले तर आई त्याची दिवस रात्र काळजी घेते. अश्या वेळी ती रात्र रात्र जगून आमची काळजी करते. माझी आई एक दयाळू आणि उदार महिला आहे. ती वेळोवेळी गरिबांना दानधर्म करते. तिला गरीब व भिकारी लोकांना अन्न देण्यात आनंद वाटतो. माझी आई दररोज न चुकता मंदिरात जाते व पवित्र सणांच्या दिवशी उपवास देखील करते.
आई आमच्या चारित्र्य विकासावर विशेष लक्ष देते. तिची इच्छा आहे की आम्ही एक आदर्श नागरिक बनो. दररोज संध्याकाळी आई आम्हाला धार्मिक बोधकथा सांगते. व आमचे भविष्य अधिक उज्ज्वल कसे करता येईल या वर ती लक्ष देते.
माझ्या आईला सकाळ पासून तर रात्र पर्यन्त कामे करावी लागतात. ती सकाळी 5 वाजता उठून जाते. आमच्या उठण्याआधीच ती आमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करून ठेवते. नंतर माझ्या शाळेच्या वेळे आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते. आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. जेव्हा ती मंदिरातून परत येते. तेव्हा घरातील इतर कामे आवरते. आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अश्या पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असते.
मला जगातील सर्वात चांगली आई मिळाल्याबद्दल अभिमान आहे.
No comments:
Post a Comment