माझा आवडता प्राणी - मांजर
------------------------
माझा आवडता प्राणी मांजर. मांजर एक घरगुती प्राणी आहे ती खूपच सुंदर आणि गोंडस असते. मांजरांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या जाती असतात. काही मांजरी काळ्या असतात तर काही पांढर्याशुभ्र. मांजरीची त्वचा पण वेगवेगळी असते. काही मांजरांचे केस लांब असतात तर काहींचे लहान असतात. मांजरीचे पूर्ण शरीर केसांनी झाकलेले असते.
मांजर दिसण्यात लहान वाघासारखी असते. खरे पाहता ती वाघांच्या प्रजातीची सदस्य आहे. तिला वाघाची मावशी पण म्हटले जाते. मांजरीला उंदर खायला खूप आवडतात. तिला दूध प्यायला पण आवडते. मांजर मांसाहारी आणि शाकाहारी दोघी प्रकारचे अन्न खाते. तसं तर मांजर ही हिंसक नसते, पण कधीकधी ती घरातील सदस्यांना नुकसान पोहचवू शकते म्हणून मांजरी पासून सावधान राहायला हवे.
मांजरीचे डोळे चमकदार असतात, तिचे डोळे भुरे किंवा हिरव्या रंगाचे असतात. मांजरीचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकतात. त्यामुळे मांजर कमी उजेडात किंवा रात्रीच्या वेळी पण दिसून जाते. रस्त्याने चालताना जर मांजर आडवी गेली तर लोक याला अशुभ मानतात. पण हा एक अंधविश्वास आहे. मांजरीला कुत्र्यापासून खूप भय वाटते कारण कुत्रे मांजरीला खाऊ शकतात.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment