LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


तीन अक्षरी शब्दांचे लेखन


 तीन अक्षरी शब्दांचे लेखन 

============================

📗आकारान्त तीन अक्षरी शब्दांमधील मधल्या अक्षरांचे इकार ( वेलांटी ) , उकार नेहमी दीर्घ असतात.

उदा. 

 वकील 

गरीब 

 फकीर

 वजीर 

 नाजूक 

 विहीर 

माहीत

 नेणीव

बहीण इ.

वरील शब्दांना विभक्तीचे प्रत्यय जोडताना वा अव्यये जोडताना जे दीर्ष इकार (वेलांटी ),उकार दीर्घ असतात ते ऱ्हस्व होतात , काही शब्दांचे लुप्त (नाहीसे ) होतात.

उदा. 

वकील - वकिलांना 

गरीब - गरिबी 

माहूत - माहुताचे 

विहीर - विहिरीत 

माहीती - माहिती 

बेडूक - बेडकाला 

पाटील - पाटलांचे 

माणूस -माणसांना 

📗 काही संस्कृत शब्दातील इकार , उकार ऱ्हस्वच असतात.

उदा. 

मधुर

प्रचुर

अंकुर

विधुर

विहित

मलिन

केंद्रित इ.

===========================







No comments:

Post a Comment