दोन अक्षरी शब्दांचे लेखन
============================
1 ] " अकरान्त " दोन अक्षरी शब्दातील ' इकार ' व ' उकार ' दीर्घ ' असतात.
उदा . - दूध , तूप , धूप ,सूप , धूर ,मूग , मूल , धूळ , ढीग , वीट , पीठ ,मीठ , पीक , तीट , भीक इ.
अपवाद - काही संस्कृत दोन अक्षरी शब्दातील इकार-उकार लेखन नेहमी ऱ्हस्वच लिहतात.
उदा - विष , प्रिय , वित्त ,गुण , सुत , सुर ,सुख इ.
काही शब्दांना विभक्तीचे प्रत्यय किंवा अव्यये लावताना उपांत्य अक्षरातील इकार -उकार ऱ्हस्व होतात.
तूप - तुपाला मूल - मुलासठी
फूल - फुलास धूळ - धुळीस
पीक - पिकांना सून - सुनेला
-------------------------------------
2 ] आकारान्त दोन अक्षरी शब्दातील सुरुवातीचे इकार , उकार ऱ्हस्व असतात.
उदा. - विळा , मुळा , मुठा , सुधा ,लिहा , फिरा
अपवाद - संस्कृत शब्द - गीता ,सीमा ,नीता
-------------------------------------
3 ] ऊकारान्त दोन अक्षरी शब्दातील सुरुवातीचे इकार ,उकार ऱ्हस्व असतात .
उदा.- गुरू , सुरू , झुरू , लिहू ,दिसू
-------------------------------------
4 ] ईकारान्त दोन अक्षरी शब्दातील सुरुवातीचे इकार - उकार ऱ्हस्व असतात.
उदा.- विडी , विटी , शिटी , गुढी , पुढी इ.
अपवाद - काही संस्कृत शब्द - नीती , कीर्ती , प्रीती यांचे लेखन दीर्घ केले जाते .
-------------------------------------
No comments:
Post a Comment